Posts

दि नॉन सिरीयस..

रविवार चा दिवस होता आम्ही सगळे मुलं खेळण्यात दंग होतो.आणि अचानकच खालच्या आळीतून बायकांचा जोर जोरात रडण्याचा आवाज येऊ लागला.आवाजाच्या दिशेने पुढे गेल्यावर चिमा आज्याच्या दारात बायकांची असंख्य गर्दी होती.काही रडत होत्या तर काही समजूतदार बायका रडणाऱ्यांना धीर देत होत्या. पण झालं काय ? का रडतात ह्या मावल्या ?काही कळायलाच मार्ग नव्हता.कारण चिमा आज्या जैसे थे होता.घरी कोणी आजारी पण नव्हतं.आणि सगळी माणसं जागेवरच हजर होती.शेवटी कसातरी गर्दी बाजूला सारून पुढे गेलो आणि बघतो तर काय एका तासापूर्वी आमच्या सर्वांच्या गोट्या जिंकून आलेला नाऱ्या चित्ताताड पडला होता.त्याच्या तोंडातून पांढरा फेस येत होता.गावातल्या एका म्हातारीने त्याच्या नाकाजवळ कांदा धरला होता.आणि नाऱ्या हळूहळू शुद्धीवर येत होता.आणि नाऱ्याचं हे रूप मी पहिल्यांदा पाहत होतो. नाऱ्या आम्हा सगळ्या पोरांना एकाच गोष्टीसाठी परिचित होता ते म्हणजे नाऱ्याचा निशाणा.कितीही दूर गोटी असली तरी नाऱ्या ती उडवल्या शिवाय राहत नसे. खरंतर नाऱ्या म्हणजे एक अशी मूर्ती होती की जिचे केसं नेहमीच उभे थाटलेले असत.आणि त्या पोरसवदा वयात त्याच्या गालफडात तंबाखूचा विड

सखे सोबती..

Image
आता पर्यंत च्या आयुष्यात अनेक व्यक्ती भेटल्या ज्यांना मी विसरू शकत नाही.कारण भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ह्या त्यांनी आपल्या आयुष्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्या आपल्या आठवणीत कायमच्या असतात.पण मला वाटतं हे केवळ समाजीकरणाच्या साच्यात घडलेल्या मानव या बुद्धिमान प्राण्यापुरतच मर्यादित नाहीये तर. त्यामध्ये मानवेतर प्राण्यांचा सुद्धा समावेश असतो. तर असच माझ्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी सिंहाचा वाटा आहे तो माझ्या परिवाराचा एक भाग असणाऱ्या माझ्या इमानदार कुत्र्यांचा.जेव्हा मी इयत्ता पहिलीत असेल तेव्हा मला माझा पहिला कुत्रा आठवतो तो म्हणजे " मुंजा " घरातील सगळे लोक त्याचा मुंज्या कुत्रा असा नामोल्लेख करत असत.पूर्ण अंगाने काळा आणि तोंडावर तेवढा तांबडा असल्यामुळे त्याला मुंजा असं म्हणत.इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत तो माझ्या सहवासात होता आणि मी त्याच्या.या चार वार्षिक आयुष्यातील त्याचे खूप किस्से असे आहेत जे माझ्या आठवणीत आहेत.शिरवा आणि धनगरवाडा या दोन्ही गावात आमची घरे आहेत आणि दोन्ही गावांच्या मध्ये आमचं शेत आहे.धनगर वाड्यातून रात्री अपरात्री जर आपत्कालीन परिस्थितीत काही प्रसंग आला

बाजार

आमच्या गावाचा बाजाराचा दिवस म्हणजे गुरुवार दररोजच्या दिवसांपेक्षा गुरुवार जास्त उत्साहाचा असायचा.आणि थोडा वेगळा भासायचा मजूर आणि शेतकरी ह्यांचा खास वाटाघाटीचा असायचा.मी मजूर वर्गातील असल्यामुळे माझी गुरवारी दिवसाची सुरुवात काहीशी अशी असायची...गण्या ऊठ लवकर महादेव बुवाच्या घरी जाय अन् पुऱ्या सहा दिवसाचे पैशे घेऊन ये..व्हय लवकर नाहीतं जाईन तो बजारात.... त्यांनंतर अंगणात पाट टाकू गरमागरम पाण्याने आंघोळ करून  घरातल्या देवांच्या फोटोची पूजा करून मजुरीचे पैसे आणायचे.               आंघोळ पाणी करून गेल्यावर मजुरीचे सर्व पैसे हातोहात मिळतात अशी त्या मागची कल्पना होती. असं एकदा आईने सांगितलेलं मला आठवतं.नाही तर सावकार लोकं उडवाउडवीची उत्तरे देत असत जस की...जा आईला सांग बाजारात देतो म्हणून.म्हणजे बाईच्याजातीनं कुठे कुठे त्याला बाजारात शोधावं.त्यापेक्षा बरं नाही का?पारोशी गेल्यापेक्षा अंघोळ करूनच जावं.              मोताळा हे तालुक्याचं ठिकाण तसं आम्हाला जवळच होतं बाजार हा तालुक्याच्या गावाला भरत असे.आमच्या वाड्यापासून तो सात आठ किलोमीटर दूर अंतरावर होता.आमच्या गावात त्यावेळेस बस दोनच वेळ यायची

आठवणीतील शाळा

एक असा भूप्रदेश जो तीन्ही बाजूंनी उंच उंच डोंगरांनी वेढलेला आहे.अगदी चुलीसारख्या आकाराची रचना असणाऱ्या नदी नाल्यांनी समृध्द असणाऱ्या प्रांतामध्ये माझ्या बालपणालाअधीकच समृद्ध करणाऱ्या आठवणींमध्ये धनगरवाडा ( आजचे अहिल्यानगर ) आणि सहस्त्रमुळी या दोन गावांचा खूप सिंहाचा वाटा आहे. चुलीत जळतन घालावं तसं या डोंगरांच्या अफाट खोऱ्यात एक काळीशार डांबरी वाट प्रवेश करते ज्याला आपण रोड म्हणतो.अशा ह्या विलक्षण सौंदर्य लाभलेल्या वातावरणात धनगरवाडा की ज्याला आम्ही वाडा म्हणायचो आणि सहस्त्रमुळी ही आमची दोन गावं लागोपाठ आहेत.आणि या दोन्ही गावांमध्ये केवळ दिड किलोमीटरचं अंतर आहे.आम्ही राहायचो वाड्यात इयत्ता तिसरी पर्यंतचं शिक्षण मात्र बाजूला असणाऱ्या शिरव्यालाच झालं होतं.पण शिरव्याचं आणि वाड्याचं अंतर जास्त असल्यामुळे आणि आईच्या हट्टामुळे आम्हाला सहस्त्रमुळी च्या शाळेत इयत्ता चौथी ला प्रवेश घ्यावा लागला होता.वाड्यापासून सहस्त्रमुळी पर्यंतच्या अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरात तीन लहान लहान नाले आणि एका नदीचा समावेश होता ज्यामध्ये शाळेला दांडी मारून खेकडे आणि मासे पकडण्यात आमचा पूर्ण दिवस जायचा.आणि अगदी बर